राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या १४३ व्या अभ्यासक्रमाचा दीक्षांत समारंभ एनडीएच्या हबीबुल्लाह सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या पदवीदान सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कुलगुरू शांतीश्री धुलीपुडी पंडित होत्या. या सोहळ्यात २३३ कॅडेट्सना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून पदवी प्रदान करण्यात आली.
या पदवी प्रदान सोहळ्यात विज्ञान शाखेतील ६५ कॅडेट, संगणक विज्ञान शाखेतील ८९ कॅडेट आणि कला शाखेतील ६० कॅडेट यांचा समावेश आहे. तसेच मित्र देशांच्या १९ कॅडेट्सनाही यावेळी पंडित यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. याशिवाय, नौदल आणि हवाई दलाच्या कॅडेट्सच्या ९५ कॅडेट्सचा समावेश असलेल्या बी टेक शाखेतील तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्याऱ्या छात्रांना देखील प्रमाणपत्र देण्यात आले. हे सर्व छात्र भारतीय नौदल अकादमी, एझिमाला आणि एअर फोर्स अकादमी, हैदराबाद तर राष्ट्रीय रक्षा अकादमी डेहराडून येथे पुढील प्रशिक्षणासाठी जाणार आहेत.