( संगमेश्वर )
राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून या कामामुळे महामार्गाला लागून असणारे दगडाचे डोंगर फोडण्यासाठी बोअरवेल ब्लास्टिंग चा वापर केला जात आहे. या ब्लास्टिंगमुळे परिसरामध्ये हायवेला लागून असणाऱ्या घरांचे नुकसान व्हायला सुरुवात झाली आहे. ही बाब लोकप्रतिनिधींनी संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देखील संबंधित ठेकेदार मनमानीपणे 180 ते 250 फुटाचे होल मारून बोरवेल ब्लास्टिंग करत आहे, मात्र त्याचा दणका कूरधुंडा येथील राष्ट्रीय महामार्गाला लागून असणाऱ्या घरांना होत आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे आरवले ते कांटे या ठिकाणचे काम म्हात्रे नावाच्या कंपनीने काम घेतले आहे. या कंपनीबाबत अनेक तक्रारी असून या विरोधात अनेक ठिकाणी या कंपनीला विरोधही झाला आहे. कंपनीकडून बेजबाबदार आणि मनमानीशाही काम केले जात असल्याचा आरोप आहे. कुरधुंडा येथे रस्ते महामार्गाला लागून पाच ते दहा मीटर अंतरावर लोकवस्ती आहे आणि या ठिकाणी जोरात बोलरवेल बॅस्टिंग केली जाते. ही बोरवेल ब्लास्टिंग रात्री होत असून या ठिकाणी असणाऱ्या घरांना मोठा दणका बसत असून हा दणका भूकंप एवढा असल्याचे लोकांना आता लक्षात आले आहे.
या विरोधात लोकांनी आता एल्गार पुकारला असून संबंधित कंपनीला ग्रामपंचायतीने तीन नोटीस देऊनही, त्याचप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता साखरपा विभागीय यांनी सुद्धा नोटीस बजावून सुद्धा या ठिकाणी बोरवेल ब्लास्टिंग केली जात आहे. जे. एम. म्हात्रे कंपनीकडून लोकांच्या जीविकास धोक्याचा खेळ केला जात असून कोणत्याही क्षणी या ठिकाणी कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ शकतो अशी येथील स्थिती आहे.
जिल्हाधिकारी यांनी पालकमंत्री नाम.उदय सामंत यांच्या आदेशानुसार संबंधित कंपनीला या भागांमध्ये बोरवल ब्लास्टिंग करू नये असे लेखी आदेश काढून सुद्धा या आदेशाला या जीएम मात्रे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवली असल्याचे बोलले जात आहे. कंपनीची हुकूमशाही पाहता लोकांकडून आता या बोरवेल ब्लास्टिंगला विरोध होत आहे. आम्हाला राष्ट्रीय महामार्ग हवा, राष्ट्रीय महामार्ग झाला पाहिजे हे ग्रामस्थांचे मत आहे, मात्र शासनाने असा कोणता जीआर काढलाय की लोकांची घर पाडा आणि महामार्ग बांधा. तो जीआर आम्हाला दाखवा म्हणजे आम्ही शांत बसू असा एक मागणी आता ग्रामस्थ करू लागले आहेत.
जर कागदपत्री घोडे नाचून जर आमची दिशाभूल केली जात असेल आणि आमच्या घरांना त्रास होत असेल आमचं कुटुंब उध्वस्त होणार असेल तर संबंधित कंपनीला जसाच तसे उत्तर देऊ त्यामुळे या ठिकाणी असणारी कायदा सुव्यवस्था अडचणीत येऊ नये म्हणून संबंधित विभागाने तत्काळ या बोरवेल ब्लास्टिंग विषयी कारवाई केली पाहिजे. ज्या कंपनीला या महामार्गाचा ठिकाणी घेतला आहे त्यांनी या ठिकाणी बोरवेल ब्लस्टिंग करावा असा कोणताही आदेश शासनाकडून पारित करण्यात आलेला नाहीत तरीसुद्धा आपला फायदा व्हावा, कामात कमी खर्च व्हावा यासाठी सोपा मार्ग म्हणून बोरवेल ब्लास्टिंग केली जात आहे. ही बोरवेल ब्लास्टिंग 250 फुटा पेक्षा जास्त असते. ब्लास्टिंगमुळे संपूर्ण गाव हादरला जात आहे. याची भीती आता या ठिकाणी राहणाऱ्या ग्रामस्थांना होऊ लागली आहे.
ग्रामपंचायतचे सरपंच त्याचप्रमाणे ग्रामस्थ लवकरच जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन संबंधित कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहेत. तरीसुद्धा या प्रशासनाने यावर कारवाई केली नाही तर कुरधुंडा ग्रामस्थांच्या हातून कायदा सुव्यवस्थेचा भंग होऊ शकतो, हे या ठिकाणी नाकारता येत नाही. कारण ग्रामस्थांना होणारा त्रास केले जाणारे बोरवेल ब्लास्टिंग हे संबंधित प्रशासनाने येऊन त्याची पाहणी करणे गरजेचे होते. मात्र तक्रार करूनही कंपनीकडून बेजबाबरीने आणि बेबंदशाहीने या ठिकाणी लोकांना उध्वस्त करण्याचं काम केलं जात आहे, असा ग्रामस्थांचा आरोप आहे.