(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष कृषीभूषण डॉ. तानाजीराव चोरगे सरांना इंटेलऍक्च्युल पीपल्स फौंडेशन नवी दिल्ली यांच्यावतीने आर्थिक आणि सामाजिक विकासात्मक केलेल्या कार्याबद्दल, राष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट चेअरमन पुरस्कार सन २०२२ – २३ मिळाल्याबद्दल रत्नागिरी तालुक्यातील विविध कार्यकारी सेवा संस्था, तसेच रत्नागिरी तालुक्यातील रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सर्व कर्मचारी वृंद यांचे वतीने जिल्हा नगर वाचनालय, रत्नागिरी येथे रविवार दिनांक २० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ठीक १० : ०० वाजता भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. या समारंभास अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे सरांना उत्कृष्ट चेअरमन हा पुरस्कार दुसऱ्यांदा मिळाला आहे. डॉ. तानाजीराव चोरगे रत्नागिरी जिल्हा बँकेला अतिशय अडचणीच्या परिस्थितीतून बाहेर काढून देशातील सर्वोत्कृष्ट जिल्हा बँक म्हणून नावारूपाला आणले आहे. डॉ. तानाजीराव चोरगे यांची उत्कृष्ट प्रशासन शैली, सहकाराविषयी तळमळ, राजकारण विरहित सहकार या सर्व बाबींमुळे जिल्हा बँकेची प्रगती झाली आहे. डॉ. तानाजीराव चोरगे यांना मिळालेला हा पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारामध्ये काम करणाऱ्या सर्वांना प्रेरणादायी आहे. डॉ. तानाजीराव चोरगे हे नेहमीच सर्व सहकारात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आदरणीय व्यक्तिमत्व राहिले आहेत. डॉ. चोरगे सरांना मिळालेल्या पुरस्कारामुळे बँकेचे सर्व संचालक मंडळ तसेच बँकेच्या सर्व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पुरस्कारांबद्दल चोरगे यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. म्हणूनच या महनीय व्यक्तीमत्वाचा २० ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी १० : ०० वाजता जाहीर सत्कार करण्यात येणार असून, डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या भव्य सत्कार समारंभास सहकारातील तसेच रत्नागिरी तालुक्यातील सर्व मान्यवरांनी मोठ्या संख्येने कौतुक समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गजानन कमलाकर तथा आबा पाटील यांनी केले आहे.