राजेश बाष्टे, अलिबाग
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या “महाराष्ट्र प्रदेश रोजगार” उपक्रमात रायगड जिल्हा समन्वयक पदी राहुल संजीव कुळकर्णी यांची निवड झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांच्या “महाराष्ट्र प्रदेश रोजगार” उपक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनी आणि युवक,युवतींना रोजगार मिळवून देण्यात मदत होणार आहे.त्यांनी नुकतीच आपली महाराष्ट्रातील जिल्हा समन्वयकांची घोषणा केली.
रायगडचे लोकप्रिय खासदार आ. सुनील तटकरे, महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. आदिती ताई तटकरे आणि विधान परिषदेतील एक तरुण तडफदार नेतृत्व आमदार श्री. अनिकेतभाई तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा समन्वयक पदी रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे एक अग्रेसर युवा कार्यकर्ते श्री. राहुल संजीव कुळकर्णी यांची निवड झाली आहे. राहुल हे MBA in HR पदवीधर असून रोहा येथील सेवादल आळी सन्मित्र मंडळ चे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. तसेच अनेक समाजकार्यात देखील ते आवडीने कार्य करताना दिसून येतात. या निवडीमुळे राहुल ह्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.