(चिपळूण)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम यांची काल शुक्रवार दि.३०/०९/२०२२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या नियुक्तीबद्दल त्याचे पुष्पगुच्छ देऊन कार्यकर्त्यांनी स्वागत केले.
यावेळी तालुकाध्यक्ष जयंत खताते, शहर अध्यक्ष मिलिंद कापडी, नगरसेवक अविनाश केळसकर, चिपळूण तालुक्यातील युवा नेते मयूर खेतले, अविनाश हरदारे आदी उपस्थित होते.