(रत्नागिरी)
सामाजिक कार्यात तसेच राजकीय क्षेत्रात सदैव तत्परतेने व संयमाने जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सौ. मुन्नवर-सुलतान फरहान मुल्ला यांची रत्नागिरी शहर महीला कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे वरीष्ठ नेते श्री. कुमार शेट्ये, महाराष्ट्राचे प्रदेश प्रांतिक सदस्य श्री. बशीर मुर्तुझा, महिला जिल्हा अध्यक्ष सौ. चित्रा ताई चव्हान यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी जिल्हा युवक कार्याध्यक्ष श्री. नौसीन काझी, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सौ.नसीमा डोंगरकर, महीला तालुका अध्यक्ष शमीम नाईक, महीला शहर अध्यक्ष सौ. नेहाली नार्वेकर,सौ. रजीया काझी, सौ.भिसे, मिरकरवाडा प्रभाग अध्यक्ष सौ. फरजाना मस्तन, सौ. झापडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. सौ. मुन्नवर-सुलतान फरहान मुल्ला यांच्यावर नियुक्तीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. यापुढे जनतेच्या हक्कासाठी नेहमीप्रमाणे सदैव तत्परतेने काम करत राहीन असे नवनियुक्त महीला कार्याध्यक्ष यांनी यावेळी सांगितले.