(जाकादेवी / संतोष पवार)
रत्नागिरी विधानसभा रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रत्नागिरी विधानसभा क्षेत्राध्यक्षपदी आगरनरळ येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पांडुरंग महाकाळ यांची राष्ट्रवादीच्या मान्यवरांच्या पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली.
प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष श्री. सुदेश मयेकर यांनी माजी सहकार मंत्री आमदार श्री.बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते श्री.राजेंद्र पांडुरंग महाकाळ यांना रत्नागिरी विधान सभा क्षेत्राध्यक्षपदी नियुक्तीपत्र देण्यात आले. हे नियुक्ती पत्र चिपळूण येथे देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांचे विचार जनतेपर्यंत पोहोचविणे व पक्ष संघटना वाढीचे काम करण्यासाठी पुढील वाटचालीस शुभेच्या देण्यात आल्या.
श्री.राजेंद्र महाकाळ यांचे सामाजिक तसेच शिक्षण क्षेत्रात भरीव काम आहे.ते एक निष्ठावान व क्रियाशील कार्यकर्ते असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम श्री.राजन सुर्वे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस हे दोघे मिळून एकत्रित उत्तम प्रकारे करतील ,असा विश्वास व्यक्त करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धडाडीचे माजी तालुकाध्यक्ष कै. डॉ.नानासाहेब मयेकर यांचे विश्वासू सहकारी म्हणून राजेंद्र महाकाळ यांना ओळखले जाते.
श्री.राजेंद्र महाकाळ यांची निवड झाल्यानंतर आगरनरळ विभागात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या या निवडीबद्दल आगरनरळ तसेच तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते यांनी शुभेच्छा दिल्या.