(नवी दिल्ली)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बुधवारी नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनात १०६ जणांना पद्म पुरस्कार प्रदान केले. राष्ट्रपतींनी पहिला मान वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी यांना दिला. त्यांच्या मुलीने वडिलांना देण्यात येणारा पद्मविभूषण पुरस्कार घेतला. यानंतर व्यापारी कुमार मंगलम बिरला यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. कुमार मंगलम हे पद्म पुरस्कार मिळवणारे बिरला कुटुंबातील चौथे व्यक्ती ठरले आहेत.
तसेच प्रख्यात पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांनाही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्मभूषण किताब प्रदान केला गेला. राष्ट्रपती भवनात झालेल्या सोहळ्यात अनेक मान्यवरांना पद्म किताबाने सन्मानित करण्यात आले. यामध्ये माजी परराष्ट्रमंत्री कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान भाजपचे नेते एस. एम. कृष्णा यांनाही पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात आले.
पांडवानी गायिका उषा यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसोबतच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला, केंद्रीय मंत्री भूपेंद्रसिंह यादव आदि अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते.