(पाटणा)
राष्ट्रपतिपदाची मुदत संपल्यानंतर गावी जाऊन शेती करणार असल्याची माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिली. मुर्मू यांनी प्रथमच भविष्यातील नियोजनाची माहिती दिली. आदिवासी समाजातील पहिल्या राष्ट्रपती बनण्याचा मान मुर्मू यांना मिळाला आहे. एका कार्यक्रमानिमित्त त्या बिहार र्दौयावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बिहारशी असलेल्या जवळीकतेबाबत माहिती दिली.
झारखंडच्या राज्यपाल म्हणून काम करीत असताना, बिहारच्या संस्कृतीची जाणीव झाल्याचेही त्यांनी नमूद केले. कृषी प्रदर्शनासंदर्भातील एका कार्यक्रमात बोलताना त्या म्हणाल्या की, मीही एका शेतक-यांची मुलगी आहे. त्यामुळे राष्ट्रपतिपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यावर गावी जाऊन तांत्रिक पद्धतीने शेती करणार आहे. शेतीतून उत्पादन वाढविण्याबाबत आणि धान्याची साठवणूक करण्याबाबत शेतक-यांकडून मार्गदर्शन घेणार आहे. मी मूळची ओडिशाची असले तरी बिहारशी नाळ कायम आहे. १९१२ नंतर बंगाल प्रांतामधून बिहार आणि ओडिशा स्वतंत्र झाले आहेत. तत्पूर्वी, दोन्ही राज्ये एकत्रच होती असेही त्यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.