(बर्मिंगहॅम)
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. काल शुक्रवार स्पर्धेचा आठवा दिवस होता. या स्पर्धेत भारताने दमदार कामगिरी केली आहे. भारत २० पदकासह पदकतालिकेत 7 स्थानावर आहे. आतापर्यंत 6 सुवर्ण, 7 रौप्य आणि 7 कांस्य पदक जिंकली आहेत. बॉक्सिंगमध्ये भारताच्या खेळाडूंनी 7 पदक निश्चित केली आहेत. हे खेळाडू जर सेमीफायनलमध्ये विजय झाले तर सुवर्णपदकासाठी रिंगमध्ये उतरतील.
भारताचा मोहित ग्रेवाल सेमीफायनलमध्ये दाखल
१२५ किलो फ्री स्टाइलमध्ये मोहितने सायप्रसच्या कॉस्लीडिसचा पराभव केला.
महिला फ्रीस्टाइल 62 किलो-साक्षी मलिकचा इंग्लंडच्या केल्सी बार्न्सवर सहज विजय
टेबल टेनिस- पुरुष एकेरीत जी साथियान प्री क्वॉर्टर फायनलमध्ये पोहोचला