(पाचल / तुषार पाचलकर)
पाचल परिसरातील जवळपास तेराशे विद्यार्थी शिकत असलेल्या सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय पाचल हायस्कूलच्या विना लायसन्स चालवणाऱ्या विद्यार्थ्यांना मुख्याध्यापकांनी वारंवार सूचना देऊन सुद्धा विना लायसन्स दुचाकी चालवत असल्याच्या वारंवार तक्रारी येतं असल्याने अशा विद्यार्थ्यांवर शुक्रवारी राजापूर पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली रायपाटण पोलीस स्टेशन चे हेड कॉन्स्टेबल कमलाकर तळेकर, यांच्या समवेत पो. कॉ. भिम कोळी,पो. कॉ. स्वप्निल घाडगे,पो.कॉ.रामदास पाटील, यांनी प्रथम समज देऊन कारवाई केली.
गेले कित्येक दिवस पाचल हायस्कूलचे विद्यार्थी शाळा भरायच्या आधी तसेच शाळा सुटल्यावर दुचाकीवरून पाचल बाजारपेठेत तसेच इतर ठिकाणी विना लायसन्स डबल सीट, ट्रिपल सीटने फिरत असल्याच्या तक्रारी पोलिसांत तसेच शाळेचा मुख्याध्यापक यांना येत होत्या. 19 ऑक्टोबर रोजी शाळेच्या मुख्याध्यापकांनी रायापाटण पोलीस स्टेशन येथे याबाबत लेखी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे समजते. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे पाचल परिसरात समाधानाचं वातारण निर्माण झालं आहे