(संगलट – खेड /इक्बाल जमादार)
महाड तालुक्यातील मांडले येथील धबधब्यावर पोहोण्याकरिता गेलेल्या रोहित पांडुरंग अवकीरकर व सचिन रामचंद्र अवकीरकर या दोन सतरा वर्षीय तरुणांचा बुडून तर पनवेल तालुक्यातील आदई धबधब्यावर वर्षा सहलीसाठी गेलेले पारस कामी (वय ३५) आणि प्रदीप कामी (वय ०७) हे मामा-भाचे यांचा दगडावर पडून अशा एकुण चौघांचा गुरुवारी धबधब्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यात घडली आहे.
महाड तालुक्यातील रायगड विभागात मांडले या ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या धबधब्यावर पोहण्यासाठी गेलेल्या रायगड हिरकणी वाडी येथील पाच युवकांपैकी रोहित पांडुरंग अवकीरकर व सचिन रामचंद्र अवकीरकर या दोन युवकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. महाडमधील साळुंखे रेस्क्यू टीमने तसेच समीर विचारे यांच्या टीमसह डव्हेंचर सोल टीमने या दोन्ही युवकांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्कू ऑपरेशन केले. सायंकाळी उशिरा दोघाचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. गुरुवारी दुपारी
साडेतीन ते चार वाजण्याच्या सुमारास हिरकणी वाडी परिसरातील एकूण पाच युवक या ठिकाणी पोहण्यासाठी आले असल्याचे सांगण्यात आले.
स्थानिक ग्रामस्थांनी व रेस्क्यू टीमच्या पथकाचे समीर विचारे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी चारच्या दरम्या ही घटना घडली. या घटनेने किल्ले रायगड परिसरातील हिरकणी येथे पूर्णपणे शोककळा पसरली आहे.
दरम्यान पनवेल तालुक्याती आदई गावाच्या हद्दीत असलेल् आदई धबधाब्यावर वर्ष सहलीसा गेलेल्या ७ जणांपैकी २ जणांचा पाय घसरून दगडावर पडल्याने त्यांच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवा घडली आहे. तालुक्यातील आद धबधब्याच्या डोंगरावर पाठीमागी बाजूने ७ जण वर्षा सहलीसाठी गे होते. या पैकी प्रदीप कामी आणि पार कामी (रा. सुकापूर) यांचा पा घसरून ते दगडावर पडले आ त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हे दोघे नात्याने मामा आणि भाचे होते. न घटनेची नोंद खांदेश्वर पोलीस ठाण्या करण्यात आली आहे.