(मुंबई)
अयोध्येतील राम मंदिर लोकार्पण सोहळ्यावरून महाराष्ट्रात एक वेगळाच सामना सुरू झाला. राम मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी देशातल्या व्हीव्हीआयपी व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले. महाराष्ट्रातूनही अनेक व्हीव्हीआयपींना निमंत्रण पाठविण्यात आले. मात्र, व्हीव्हीआयपी व्यक्तीच्या यादीत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे नावच नाही. तिथेच, राज ठाकरे व्हीव्हीआयपी यादीत आहेत. अयोध्येतल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून व्हीव्हीआयपी व्यक्तींना निमंत्रण धाडण्यात आली आहेत.
त्यांनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा : गिरीश महाजन
गिरीश महाजनांनी संजय राऊतांवर देखील टीका केली आहे. गिरीश महाजन म्हणाले, घरी बसून भूमिका घेण्यात आणि प्रत्यक्ष करण्यात फरक आहे. राज्याला आणि देशालाही माहिती आम्ही कारसेवक जेलमध्ये होते. घरात बसून भूमीका घेणं आणि प्रत्यक्ष कारसेवा करणं यात फरक आहे. आम्ही 20 दिवस जेलमध्ये होते. संजय राऊत, उद्धव ठाकरे त्यावेळी कुठे होते? बाळासाहेब ठाकरेंच्या भूमीकेबाबत दुमत नाही. मात्र जे बोलतायेत ते आयत्या बिळावरचे नागोबा आहे. संजय राऊतांनी, उद्धव ठाकरेंनी कारसेवेचा एखादा फोटो दाखवावा.
ठाकरे गटाचे नेते आणि खासदार यांनी म्हटलं होतं की, आम्हाला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण येणार नाही. अडवाणींना ज्यासाठी आमंत्रण दिलं गेलेलं नाही त्याचं कारणास्तव आम्हाला आमंत्रण दिलं गेलेलं नाही. कारण आमचं त्याच योगदान आहे. आम्ही त्या प्रकरणातले आरोपी आहोत. ज्यांचं काही योगदान नाही त्यांचा तो सोहळा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार काही नाही अशा जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु होत्या. परंतु विश्वस्त समितीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर उद्धव ठाकरे यांना निमंत्रण मिळणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.
मुंबईहून थेट रामजन्मभूमी अयोध्येसाठी विमानसेवा
आता मुंबईहून थेट रामजन्मभूमी अयोध्येसाठी विमानसेवा सुरु होणार आहे. इंडिगोनं मुंबई-अयोध्या आणि अयोध्या-मुंबई थेट फ्लाईटची घोषणा केलीय. 15 जानेवारीपासून मुंबई-अयोध्या थेट विमानसेवा सुरु होणार आहे. दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी मुंबईहून अयोध्येसाठी विमान रवाना होईल. दुपारी 2 वाजून 45 मिनिटांनी अयोध्येत विमानाची लँडिंग होईल. अयोध्येहून मुंबईसाठी दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी विमानाचं उड्डाण होईल, 5 वाजून 40 मिनिंटांनी मुंबईत लँडिंग होईल. 30 डिसेंबरपासून दिल्ली-अयोध्या आणि 11 जानेवारीपासून अहमदाबाद-अयोध्या विमानसेवा सुरु होतेय. आता थेट मुंबईहून अयोध्येसाठी विमानसेवा सुरु होत असल्यामुळे रामभक्तांसाठी ती पर्वणी ठरणार आहे.
धर्म हा वैयक्तिक निवडीचा विषय असून त्याचा वापर राजकीय फायद्यासाठी केला जाऊ नये. अयोध्येत मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने तोच प्रकार सुरू असल्याने निमंत्रण मिळाले असले तरी आमचा पक्ष २२ जानेवारीच्या कार्यक्रमाला जाणार नाही, असे इंडिया आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने मंगळवारी जाहीर केले. माकप पाठोपाठ डाव्या आघाडीतील भाकपसारखे पक्षही अयोध्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. माकप सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी राममंदिराच्या उद्घाटनाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण नाकारताना निमंत्रण मिळूनही ते कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत, असे म्हटले आहे.