(मुंबई)
मुंबई जेव्हा जळत होती तेव्हा एकमेव हिंदुहृदयसम्राट आपल्या शिवसैनिकांसोबत उभे होते. जेव्हा आपल्या धर्माविरुद्ध कोणी शस्त्र उचलत असेल तर त्याचे निर्दालन करावेच लागते. हृदयात राम आणि हाताला काम असं आमचं हिंदुत्व आहे. शिवसैनिक आपल्या जीवाची पर्वा न करता तुमच्या मदतीला धावून येतात. कधी-कधी त्यांना जीवाची बाजी लावाली लागते. आपल्या गृहमंत्र्यांनी मध्यप्रदेशमध्ये सांगितलं की, निवडणूक जिंकल्यास सर्वांना अयोध्येला नेऊन रामलल्लाचं मोफत दर्शन देवू,काय रामलल्ला तुमची प्रॉपट्री आहे का? दर्शन मोफतच द्यायचं असेल तर सर्व राज्यातील लोकांना द्यावे, केवळ मध्य प्रदेशमध्ये भाजपला मतं देणाऱ्या लोकांनाच मोफत रामलल्लाचे दर्शन देणाऱ्या भाजपचे हिंदुत्व हे दुटप्पी आहे, असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी भाजपवर केला आहे.
मराठी आणि यूपीचे लोक हे दूध आणि सारखेसारखे आहेत. पण काही लोक त्यामध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम करतात. अशापासून दूर रहा. निवडणुकीच्या वेळी काही लोक यूपीतून येतात आणि इथल्या लोकांचे ब्रेन वॉश करतात अन् निघून जातात, मात्र आम्ही निवडणुकीनंतरही तुमच्यासोबत राहतो. एका चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आयोजित गोवर्धन पूजा समारंभात शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आम्ही गुजरातच्या विकासाच्या आड नाही. मात्र केवळ गुजरातचा विकास झाल्यावर देशाचा विकास होणार? अन्य राज्यांचा विकास झाल्यावर देशाचा विकास होणार नाही का? देशात केवळ गुजरात एकच राज्य आहे का? मग महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होणार नाही का? गुजरात सोडून देशात इतरही राज्ये आहेत, असा टोला उद्धव यांनी मोदींना लगावला.