(चिपळूण)
शिव आरोग्य सेना, नॅब.आय. हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र रामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर मोठ्या प्रतिसादामध्ये उत्साहामध्ये पार पडले. सदर शिबिर रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आयोजित करण्यात आले होते.
या शिबिरासाठी 211 मोफत नेत्र तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 40 रुग्णांना डोळ्यामध्ये मोतीबिंदू आढळला. तर त्यातील 37 रुग्णांचे नॅब आय हॉस्पिटल चिपळूण येथे मोफत डोळ्यामध्ये लेन्स टाकून शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. या शिबिरा करता शिव आरोग्य सेनेच्या जिल्हा सहसमन्वयक श्री शशिकांत चव्हाण यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले.
या शिबिराकरता शिव आरोग्य सेनेच्या जिल्हा समन्वयक सौ.सुचित्रा खरे, नॅब आय हॉस्पिटल डेव्हलपमेंट ऑफिस श्री संदीप नलावडे, रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. निकिता शिर्के, डॉ. धनराज मुंडे, डॉ. दरवाजकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागातील सर्व पदाधिकारी उपतालुकाप्रमुख, युवा आघाडी, महिला आघाडी, विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख अनेक गावातील सरपंच उपसरपंच अनेक सदस्य या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.