(संगलट / इक्बाल जमादार)
शिवखुर्द गावातील चौगुलेवाडी, उदेशवाडी, कालेकरवाडी येथील ग्रामस्थांचा रामदासभाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी महिला भगीनींचा सहभाग मोठ्या संख्येने होता व माजी जि. प. सदस्य कै. राजाराम भूवड यांचे हे गाव १०० टक्के हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रमाणित झालेले गाव पुन्हा एकदा रामदासभाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत कार्यरत झाले. श्री. उदय शिंदे यांना यासाठी विशेष प्रयत्न व मेहनत घेतली तसेच पन्हाळजे गावच्या सरपंच उपसरपंचासह शेकडो ग्रामस्थ शिवसेनेत सक्रीय झाले.
कुडोशी दंडवाडी कुळवंडी पिंपळवाडी येथील ग्रामस्थांनीही भगवा खांदयावर घेतला. जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख अरविंद चव्हाण, आण्णा कदम, सचिन धाडवे, शांताराम म्हसकर, शंकर कांगणे, सिंकदर जसनाईक, मुस्ताक नांदगावकर, रमेश सागवेकर, मिलीद काते, प्रशांत चव्हाण, संजय मोदी, मिनार चिकले, स्वप्नील सैतवडेकर, कुंदन सातपुते, दगडू निकम, अशोक बुवा निकम, मनोज आंब्रे, संदिप आंब्रे, प्रभाकर आंब्रे, योगेश आंब्रे, चंद्रकांत चाळके, रोशन कालेकर, सचिन ऊर्फ आण्णा आंब्रे, संजय मोरे, सागर बैकर, व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. विजय भूवड, कृष्णा माळी, विश्वास धामणस्कर, लक्ष्मण परळकर, एकनाथ जावळे, मनोहर चौगुले, मनोज बोंडसकर, प्रकाश रसाळ, सतिश काणेकर, सागर पांचाळ, तुकाराम उदेग, व त्यांचे सर्व सहकारी कुळवंडी गावचे वसंत निकम, सुरेश निकम, श्रीराम निकम, बळीराम निकम, दिपक निकम, शंकर खोपकर, विठ्ठल खोपकर, सचिन पेवेकर, अनंत खोपकर, महेश पेवेकर, व त्यांचे सर्व सहकारी तसेच कुडोशी व पन्हाळजे गावातील शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत सक्रीय होऊन त्यांनी भगवा खांदयावर घेतला.