रत्नागिरी शहरातील मुरुगवाडा येथे घराच्या अंगणामध्ये उभी करून ठेवलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना ४ मार्च रोजी रात्री २ ते सकाळी १० वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरुगवाडा येथील घराच्या अंगणातून ही दुचाकी चोरीला गेली असून, तिची किंमत ७० हजार रुपये इतकी आहे.
याप्रकरणी साहिल बिजू नायर ( २१, पिलणकरवाडी, रा.मुरुगवाडा, रत्नागिरी ) यानी फिर्याद दिली आहे. त्याने ४ मार्च रोजी सुझुकी कंपनीची पांढऱ्या रंगाची ॲक्सेस १२५ ( एमएच ०८ एझेड ४८८९ ) ही गाडी मामा तुषार पिलणकर यांच्या घराच्या अंगणात उभी करून ठेवली होती. मात्र, सकाळी त्याने अंगणात पाहिले असता दुचाकी चोरीला गेल्याचे लक्षात आले. याबाबत ८ मार्च रोजी रत्नागिरी शहर पोलिस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.