तेजा मुळ्ये, रत्नागिरी
काही क्षण मी धुंदीत राहिले. वेडच मन असतं आपलं. बारीकसारीक संदर्भांनी क्षणात लहानणपणात डोकावून येत. आम्ही दोघी नेहमीच्या सोनारांकडे गेलो त्यांनी डबीत लावलेले चांदीचे कानातले दाखवले. खूप छान कलाकुसर असलेले कलात्मक रातराणीच्या फुलासारखे कर्णालंकार पाहून कौतुक वाटलं. काय सुचतं कलाकार मंडळींना आणि कलाकुसर करणाऱ्या कारागिरांना! दुकानदाराने सांगितलेल्या अनुभव कथनाने लक्षात आलं, खऱ्या रातराणीच्या सुवासाने वेड लावणाऱ्या या रातराणी अलंकाराने देखील लोकांना वेडं केलं आहे.
आता वेलीवर झाडांवर फुलणारी अजूनही काही फुलं अशीच अलंकार सदृश्य आपल्या भेटीला येतील कदाचित !