(रत्नागिरी)
राज्य पतसंस्था फेडरेशनचे कार्याध्यक्षपदी अँड.दीपक पटवर्धन यांची निवड झाली असून कोकणाला पहिल्यांदाच हा बहुमान मिळत आहे.
राज्य पतसंस्था फेडरेशन गेली 26 वर्षे राज्यामध्ये कार्यरत असून सुमारे साडेचार हजार पतसंस्था या फेडरेशनच्या सभासद आहेत. पतसंस्थांच्या विविध प्रश्नांवर पतसंस्था फेडरेशन नेहमी काम करत आली आहे.
अँड. दीपक पटवर्धन हे गेली पाच वर्षे फेडरेशनवर तज्ञ संचालक म्हणून कार्यरत होते. यावेळी झालेल्या निवडणुकीत बिनविरोध म्हणून संचालक निवडुन आले होते.
आज पदाधिकाऱ्यांच्या निवडीच्या वेळी अध्यक्षपदी काकासाहेब कोयटे व कार्याध्यक्षपदी अँड दीपक पटवर्धन यांची निवड करण्यात आली.राज्य फेडरेशनवर एकूण 13 पदाधिकारी यांची निवड करण्यात आली.
कोकणातील व्यक्ती प्रथमच सहकार क्षेत्रात राज्य फेडरेशन च्या कार्याध्यक्षपदी निवडीबद्दल कोकणात जल्लोषपूर्ण वातावरण असून अँड. दीपक पटवर्धन यांचे सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.