(रत्नागिरी)
मुंबई युनिव्हर्सिटी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे राज्यस्तरीय तायक्वांदो पुमसे व क्योरोगी स्पर्धा दिनाक 30 ते 3 जुलै दरम्यान होणार आहेत. सदर स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिग सेंटरच्या स्वरा टेरवांनकर, भार्गवी पवार, योगराज पवार, सई सुवरे, नुपूर दप्तरदार, अमेय पाटील, वेदांत देसाई, अमीन बुडये, नीलाक्षी रहाटे या 9 खेळाडूंची निवड राज्य स्पर्धेकरिता झाली आहे. आज दिनाक 29 रोजी हे सर्व खेळाडू चिपळूणहून रवाना होत आहेत. यासाठी प्रशिक्षक म्हणून तेजकुमार लोखंडे, महिला प्रशीक्षिका म्हणून सौ शशीरेखा कररा काम पाहणार आहेत.
युवा मार्शल तायक्वांदो ट्रेनिंग सेंटरचे अध्यक्ष कोमल सिंह व सर्व पदाधिकारी तसेच अन्नपूर्णा संगीत विद्यालय ओम साई मित्र मंडळचे अध्यक्ष श्री आनंत आगाशे यांनी या सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या खेळाडूंची निवड झाल्याने महाराष्ट्र तायक्वांदो असोसिएशनचे कोषाध्यक्ष व रत्नागिरी तायकोंदो स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, कोषाध्यक्ष शशांक घडशी, सचिव लक्ष्मण कररा, सदस्य संजय सुर्वे यांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.