सध्या कडाक्याच्या उश्म्यामुळे राज्यातील जनता बेजार झाली आहे. अशातच गेल्या काही दिवसांमध्ये कोळशाच्या कमरतेमुळे देशावर आणि राज्यात वीज संकट घोंगावत होते. राज्यातील काही भागांमध्ये भारनियमन देखील करण्यात आले होते. मात्र, राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आता भारनियमावर स्पष्टीकरण दिलं आहे. राज्यात भारनियमाच्या नुसत्या अफवा उठवण्यात येत आहेत, असं नितिन राऊत म्हणाले.
ऊर्जा विभागाच्या तीनही कंपन्यांनी एकत्रित येऊन काम केल्यामुळे गेल्या 22 दिवसांमध्ये कोणतेही भारनियमन झालेले नाही. महावितरण ही वीजवितरणासोबत रात्र अन् दिवस सेवा देणारी कंपनी आहे, असं नितीन राऊत म्हणाले. कोरोना काळ, अतिवृष्टी आणि महापुरामध्येही राज्यामध्ये अखंडीत वीजपुरवठा देण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावली होती. वीज पुरवठा नियमित ठेवणे हे महावितरणाचे कार्य आहे. ग्राहकांनीही आपली वीज देयके वेळेत भरून कंपनीला वीज कापण्याची संधी देऊ नये, असं ऊर्जामंत्र्यांनी म्हटलं आहे.