महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने राज्यात 15 मे पर्यंत लॉकडाऊन केले आहे. कोरोना संसर्गाचा वाढता वेग बघता रेल्वे बोर्डाने मोठा निर्णय घेतला आह. महाराष्ट्रातून धावणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.रेल्वे बोर्डाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रातून धावणाऱ्या तब्बल 21 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 10 मे ते 30 जून या कालावधीत या गाड्या बंद राहणार आहेत. आरक्षण तिकिटांचे रिफंड रेल्वे स्थानकातून परत मिळेल, असे रेल्वे बोर्डाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रद्द केलेल्या गाड्या
डीआर ते पीव्हीआर (01027), पीव्हीआर ते डीआर (01028), डीआर ते एसएनएसआय (01041), एसएनएसआय ते डीआर (01042), डीआर ते एसएनएसआय ( 01131), एसएनएसआय ते डीआर (01132), सीएसएमटी ते जीडीजी (01139), जीडीजी ते सीएसएमटी ( 01140), नागपूर ते कोल्हापूर (01403), कोल्हापूर ते नागपूर ( 01404), मुंबई ते कोल्हापूर (01411), कोल्हापूर ते मुंबई (01412), सीएसएमटी ते पुणे (02015), पुणे ते सीएसएमटी (02016), पुणे ते नागपूर (02035), नागपूर ते पुणे (02036), पुणे ते नागपूर (02041), नागपूर ते पुणे (02042), सीएसएमटी ते बीआयडीआर (02035), बीआयडीआर ते सीएसएमटी (02044) सीएसएमटी ते मनमाड (02109), मनमाड ते सीएसएमटी ( 02110), मुंबई ते अमरावती ( (02111), अमरावती ते मुंबई ( 02112), पुणे ते नागपूर (02113), नागपूर ते पुणे (02114), मुंबई ते सुरत (02115), सुरत ते मुंबई (02116), पुणे ते अमरावती (02117), अमरावती ते पुणे (02118), डीआर ते एसएनएसआय (02147) एसएनसएसआय ते डीआर (02148), मुंबई ते नागपूर (02189), नागपूर ते मुंबई (02190), मुंबई ते लातूर (02207), लातूर ते मुंबई (02208), पुणे अजनी (02223), अजनी ते पुणे (02224), पुणे ते अजनी (02239), अजनी ते पुणे (02240), मुंबई ते जालना (02271), जालना ते मुंबई (02272) या गाड्या 10 मे पासून धावणार नाहीत, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
Post Views: 46