भाजपचे पाच आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, आमदार रमेश पाटील, आमदार निरंजन डावखरे, व आमदार भाई गिरकर या पाच आमदारांनी अडीच कोटी रुपये देऊन रत्नागिरी जिल्ह्यात चार तर सिंधुदुर्गात 3 असे सात कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहे.
त्याचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 8 जुलैला होणार असून तशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे. या 7 सेंटरमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळ ,खंडाळा, कोंडगाव, हातिवले तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड ,मालवण, आणि सावंतवाडी या ठिकाणी हे कोविड सेंटर सुरू होणार आहे. या प्रत्येक कोविड सेंटरला पस्तीस बेड व ऑक्सिजन ची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्याच बरोबर परकर हॉस्पिटल येथे 100 बेड चे अंत्योदय प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. नीता प्रसाद लाड व आमदार प्रसाद लाड यांनी दीड कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या कोविड सेंटरचा आठ तारखेला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ही उदघाटन होणार आहे.
यामध्ये 40 साधे बेड, 20 लहान मुलांसाठी बेड, 20 ऑक्सिजनचे बॅड व वीस व्हेंटिलेटर चे बेड असे एकूण 100 बेडची व्यवस्था या कोविड सेंटरमध्ये करण्यात आलेली आहे.