(रत्नागिरी/प्रतिनिधी)
महाराष्ट्र स्टेट व्हेटेरन्स ॲक्वाटीक असोसिएशनमार्फत दि. ८, ९ ऑक्टोबरला २३वी राज्यस्तरीय मास्टर्स स्विमींग चैंपियनशीप स्पर्धा नांदेड येथे आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील २५ ते ८० वर्षे या वयोगटातील स्त्री-पुरूष जलतरणपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या स्त्री-पुरुष जलतरणपटूंना स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल त्यांनी गोपाळ बेंगलोरकर ९८९०३५१२०५, सौ. मनिषा संजय बेडगे ८४५९०५२६८८, शंकरराव मिलके ९८९०८९६७६२ यांच्याशी संपर्क साधून प्रवेश अर्ज प्राप्त करून घ्यावेत.
सदर स्पर्धेकरिता नावनोंदणी सुरू झाली असून अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख दि. ३० सप्टेंबर अशी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त जलतरणपटूंनी राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घ्यावा, यासाठी असोसिएशनमार्फत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. राज्यस्तरीय स्विमिंग चैंपियनशीप स्पर्धेत जास्तीत जास्त मेडल्स मिळविण्याची सुवर्णसंधी या निमित्ताने प्राप्त झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्वल करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व जलतरण संघटनांचे पदाधिकारी, जलतरणप्रेमी यांनी राज्यस्तरीय स्पर्धेतील खेळाडूंचा सहभाग वाढविण्यासाठी व्यापक जनजागृती अभियानाला सुरूवात केली. आहे. तालुकास्तरावर सर्वांना पत्र पाठवून जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, यासाठी जलतरण संघटना पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा सुरू ठेवला आहे.
प्रत्येक तालुक्यात पत्रव्यवहार सुरू असून राज्यस्तरीय स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दि. ३० सप्टेंबरपर्यंत वरील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी आपल्या नावांची नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.