(प्रतिनिधी/लांजा)
तालुक्यातील आसगे येथे रविवारी ३ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत संगमेश्वर देवळे येथील आदित्य शिर्के यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला.
बैलगाडी स्पर्धेचे निर्बंध उठल्यावर यासह कोरोना संकटा नंतर लांजा तालुक्यात बैलगाडी स्पर्धेचे आयोजन केले जात आहेत. लांजा तालुक्यात भांबेड येथील स्पर्धेनंतर आसगे पंचक्रोशी शेतकरी मंडळाच्यावतीने रविवारी राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेत ६६ बैलगाडी संघ सहभागी झाले होते. आयोजित करण्यात आलेल्या विना काठी बैलगाडी स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला. स्पर्धा खिल्लारी आणि गावठी अशा प्रकारात घेण्यात आली.
राज्यस्तरीय स्पर्धेत संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील आदित्य शिर्के यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक कोसुंब ता. संगमेश्वर येथील किरण जाधव यांच्या बैलगाडीने तर तृतीय क्रमांक बोंडये ता. संगमेश्वर येथील रोशन किर्वे यांच्या गाडीने पटकावला. चौथा क्रमांक शाहूवाडी तालुक्यातील वारूळ येथील केशव कोंडीबा सपकाळ यांच्या गाडीने तर पाचवा क्रमांक संगमेश्वर तालुक्यातील मेंघी येथील प्रशांत बेटकर यांच्या गाडीने पटकावला. यासह गावठी बैलजोडीच्या प्रकारात सुनील गोपाळ पाटगाव यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक गोळवली येथील अमोल किंजळकर यांच्या गाडीने तर तृतीय क्रमांक गोळवली येथील मल्लू कींजळकर यांच्या गाडीने पटकावला. तर आसगे गाव मर्यादित स्पर्धेत रमेश पावसकर यांच्या गाडीने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक अब्बास पाटणकर यांच्या गाडीने तर तृतीय क्रमांक भाई मांडवकर यांच्या गाडीने पटकावला. स्पर्धेसाठी पंच म्हणून रविंद्र वासूरकर, प्रकाश हर्चेकर , अल्लाउद्दीन नेवरेकर यांनी काम पाहिले.