(रत्नागिरी)
तायक्वांदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र व जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने 32वी महाराष्ट्र राज्य ज्युनियर तायक्वांदो अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा दि. 26 ते 28 जानेवारी दरम्यान श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकुल, जळगाव या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेसाठी राज्यभरातून सुमारे 600 खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
सदर राज्य स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रांनिग सेंटर साळवी स्टॉप शाखा या अकॅडमीच्या सिनियर खेळाडूंनी फ्री स्टाईल पम्मसे व क्योरॉगी फाईट मध्ये सौ. शाशिरेखा कररा (सुवर्ण पदक), श्री अमित जाधव (सुवर्ण पदक) व ज्युनियर संघात कू.मयुरी कदम (रौप्य पदक) संपादन करून रत्नागिरी तालुका आणि जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
सदर खेळाडूंना तायक्वांडो फेडरेशन ऑफ इंडिया चे महासचिव श्री मिलिंद पठारे (शिवछत्रपती पुरस्कार विजेते) रत्नागिरी जिल्हा तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष व महाराष्ट्र तायक्वांडो असोसिएशन पदाधिकारी (शासनाचे जिल्हा संघटक पुरस्कार विजेते) श्री वेंकटेश्वरराव कररा, जिल्हा महासचिव श्री लक्ष्मण कररा(5th dan ब्लॅक बेल्ट), जिल्हा कोषाध्यक्ष श्री शशांक घडशी ( शासनाचे मार्गदर्शक पुरस्कार विजेते), युवा तायक्वांडो असोसिएशन चे अध्यक्ष श्री राम कररा (शासनाचे युवा पुरस्कार विजेते) यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.