(रत्नागिरी)
मुंबई मध्ये मुंलूड येथील कालीदास स्पोर्टस कॉम्प्लेक्स स्टेडियम मध्ये दिनांक 14 ते 15 ऑक्टोबर 2023 रोजी ओपन राज्य तायक्वांदो चॅम्पियनशिप आयोजन करण्यात आली होती. या स्पर्धेकरता रत्नागिरी मधील गणराज, एस आर के, जय भैरी, तायक्वांदो क्लबचे खेळाडू सहभाग एकूण 27 खेळाडू सहभाग झाले होते. ओपन राज्य तायक्वांदो चॅम्पियनशिप स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रामधून 580 खेळाडूनी सहभाग नोंदवला होता. रत्नागिरीतील पदक विजेते खेळाडू पुढील प्रमाणे.
सुवर्ण पदक- सुरभी पाटील, स्वरा साखळकर, राधा रेवाळे, विधान कांबळे, मृदूला पाटील, गौरी विलणकर, त्रिशा मयेकर.
रौप्य पदक- मृण्मयी वांयगणकर, आदया कवितके, सानवी मयेकर, ओम अपराज, आर्या शेणवी.
कांस्य पदक- स्वरा साखळकर, रुद्र शिंदे, केतकी चिगरे वेदिका पवार, सोहम सांवतदेसाई, आर्या पाटोले.
पुमसे- स्वरा साखळकर- व्यक्तीक कांस्य पदक.
सहभाग- बरखा संदे, आर्या शिवदे.
या स्पर्धेकरता गणराज क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष श्री. प्रशांत मकवाना ,एस आर के तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक व अध्यक्ष श्री शाहरुख शेख व जय भैरी तायक्वांदो क्लबचे मुख्य प्रशिक्षक श्री. मिलिंद भागवत यांचे यां खेळाडूना मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.
मुंबईमध्ये मुंलूड येथील स्पर्धेकरीता विजेते खेळाडूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारागजे, सेक्रेटरी मिलिंद पाठारे, खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे, तालुकाध्यक्ष राम करा, सचिव शाहरुख शेख, उपाध्यक्ष मिलिंद भागवत, कोषाध्यक्ष प्रशांत मकवांना, यांनी पदक विजेत्या खेळाडूना शुभेच्छा दिल्या.