(नवी दिल्ली)
जम्मू- काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यात शुक्रवार सकाळपासून सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या वाहनावर केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात ५ जवान शहीद झाले आहेत. २० एप्रिल रोजी पुंछमध्ये लष्कराच्या ट्रकवर झालेल्या हल्ल्यात ५ जवान शहीद झाले होते. या हल्ल्यातील दहशतवाद्यांचा शोध घेण्याकरिता ३ मेपासून अभियान राबवण्यात येत आहे.
या हल्ल्यात २ जवान जागीच शहीद झाले, तर ४ जण जखमी झाले. जखमींना तातडीने हेलिकॉप्टरने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु ४ जखमींपैकी तिघांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा ५ झाला आहे. या चकमकीत शहीद झालेल्या जवानांची संख्या वाढू शकते, असे लष्कराने म्हटले आहे. या चकमकीत काही दहशतवादीही ठार झाल्याची शक्यता आहे.