( रत्नागिरी / प्रतिनिधी )
शहरालगतच्या राजीवडा येथे तरुणाने चोरी केल्याचा समज करून घेत फावड्याने मारहाण केल्याची घटना 22 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास घडली. मारहाण प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अब्बास वस्ता (राजीवडा, पूर्ण नाव माहीत नाही) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. याबाबतची फिर्याद रेहान बाबामिया मस्तान (35, व्यवसाय मासेमारी, मिरकरवाडा, रत्नागिरी) याने पोलिस स्थानकात दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेहान मस्तान याने बोटीवरील पितळेच्या रींगा चोरल्याचा समज करून घेत अब्बास याने मारहाण केली. राजीवडा येथील फॅक्टरीत नेऊन शिवीगाळ करून पोटरीवर, डोक्यात, पायावर फावड्याने मारहाण करून दुखापत केली. याबाबत रेहान याने शहर पोलीस स्थानकात फिर्याद दाखल केली. त्यानुसार अब्बास याच्यावर भादविकलम 324, 323, 504 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.