(रत्नागिरी)
रत्नागिरी शहरातील राजिवडा येथे भाट्ये पूलाखाली १९ वर्षीय तरुणाने दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी ११.३०वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली.
मुस्तकी मुजावर यांनी शहर पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार मोहिन मल्लीक मुजावर यांने आपल्या राजिवडा येथील रहात्या घरी पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. मोहिन घरातील एका खोलीतून बराच वेळबाहेर न आल्याने नातेवाईक त्याला पहाण्यासाठी आतील खोलीत गेल्यानंतर त्याने आत्महत्या केल्याचे लक्षात आले.
भाऊ मुस्तकी मुजावर यांनी शहर पोलीसाना याची माहिती दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जावून पंचनामा करुन मृतदेह ताब्यात घेतला. मात्र मोहिनने आत्महत्या का केली याचे कारण अध्याप स्पष्ट झालेले नाही.