(कोल्हापूर)
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी महाडिक गटाने बाजी मारली आहे. महाडिकांनी सतेज पाटील यांच्या गटाला धोबीपछाड दिली आहे. पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूरमधील श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल लागला आहे. सत्ताधारी नेते महादेवराव महाडिक आणि विरोधी नेते सतेज पाटील यांची साखर कारखाना निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठापनाला लागली होती.
महादेव महाडिक यांच्यासह महाडिक गटाचे सर्व उमेदवार निवडून आल्याने कोल्हापुरात जल्लोष करण्यात आला. मतमोजणीला सुरुवात झाल्यापासून महाडिक गटाच्या उमेदवारांनी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत टिकवली. स्वतः महादेव महाडिक हे संस्था गटातून विजयी झाले. त्यांनी सचिन पाटील यांचा पराभव केला. या साखर कारखाना निवडणुकीसाठी 91.12 टक्के इतकं चुरशीने मतदान झाले. या निवडणुकीसाठी दोन अपक्षांसह एकूण 44 उमेदवार रिंगणात होते.
महाडिक गटाचे विजयी उमेदवार – विजय भोसले 6803, संजय मगदूम 6651, शिवाजी पाटील 6692, सर्जेराव भंडारे 6518, आमल महादेवराव महाडिक 6936, मारुती गोविंदा चौघुले 6755, विश्वास ईडकर 6610, वैष्णवी नाईक, 6837, कल्पना पाटील 6811, किडगावकर 6760, विलास जाधव 6548, सर्जेराव पाटील 6546, तानाजी पाटील 6636, दिलीपराव पाटील 6665, मीनाक्षी पाटील 6593, दिलीप उलपे 6742, नारायण चव्हाण 6545 संतोष पाटील 6870, देवप्पा तानगे 6884, नंदकुमार भोपळे 6599.