(राजापूर)
येथील शिवबा प्रतिष्ठान राजापूरच्या वतीने प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ‘राजापूर श्री २०२२’ जिल्हास्तर शरीरसौष्ठव स्पर्धेत आपल्या शरीरसौष्ठवाचे शानदार सादरीकरण करत एनएसजी फिटनेस चिपळूण व्यायामशाळेच्या समिर मोरे याने जिल्हास्तरावरील विजेतेपदाचा किताब पटकावला. तर तालुकास्तरावरील ‘राजापूर श्री २०२२’ चा बहुमान आरएसपीएम राजापूर व्यायामशाळेच्या अजिंक्य कदम याने पटकावला.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे ही भव्य स्पर्धा पार पडली. यामध्ये जिल्हाभरातील व्यायामपटुंनी भाग घेत आपल्या शरीरसौष्ठवाचे सादरीकरण केले. जिल्हास्तरीय ‘राजापूर श्री २०२२’ ही स्पर्धा चार गटात खेळविण्यात आली. या चार गटातून प्रत्येकी पाच जणांची निवड करण्यात आली. अंतीम स्पर्धेसाठी निवड झालेल्या वीस स्पर्धकांनी आपल्या शरीरसौष्ठवाचे शानदान प्रदर्शन केले. यामध्ये चिपळूण व्यायामशाळेच्या समीर मोरेने बाजी मारत राजापूर ‘राजापूर श्री २०२२’ चा किताब पटकावला.
तर या स्पर्धेतील ‘बेस्ट पोजर’ म्हणून फेक्स हार्डकोअर रत्नागिरी व्यायामशाळेच्या प्रणव कांबळी याची तर ‘उगवता तारा’ म्हणून आरएसपीएम राजापूर व्यायामशाळेच्या हर्षद मांडवकर याची निवड करण्यात आली. तर तालुकास्तरावर झालेल्या स्पर्धेत तीन गटात १४ स्पर्धक सहभागी झाले. त्यातून अजिंक्य कदम याने बाजी मारत ‘राजापूर श्री २०२२’ चा किताब पटकावला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर, माजी नगराध्यक्ष अॅणड. जमिर खलिफे, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, माजी नगरसेवक सौरभ खडपे, प्रांताधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार सौ. दिपाली पंडीत, , सुशांत मराठे, रूपेश कांबळे, आफताब शेख, मनसेचे प्रकाश गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
यावेळी विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व आकर्षक चषक देवून सन्मानीत करण्यात आले. जिल्हा स्तरीय प्रथम विजेत्या समीर मोरे याला पंढरीनाथ आंबेरकर यांच्या हस्ते तर तालुकास्तरीय विजेत्या अंजिक्य कदम याला स्वप्नील बाकाळकर यांच्या हस्ते पारितोषिक देवून सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेला प्रमुख पंच म्हणून शैलेश जाधव यांनी तर सहाय्यक पंच म्हणून विरेंद्र वणजु, दिनानाथ कोळवणकर यांनी काम पाहिले. स्पर्धा संचालन सदानंद जोशी व सुशांत पवार यांनी केले तर सुत्रसंचालन दिलीप कारेकर, जितेंद्र नाचणकर यांनी केले.स्पर्धा यशस्वीतेसाठी शिवबा प्रतिष्ठानच्या संदेश आंबेकर, राजा खानविलकर, भुषण आरेकर, संदेश गुरव, सुरज पेडणेकर, दिपक चव्हाण, मंदार पेणकर, सुशांत पवार, मंदार बावधनकर, साईराम अमरे, डॉ. सुयोग परांजपे, हर्षद मांडवकर, राजीव राणे, सत्यवान लोळगे, सुनिल पवार, संदीप चव्हाण, अविनाश तांबट, कृष्णा करंबेळकर, अक्षय पोकळे, प्रज्योत खडपे, निलेश खानविलकर, स्वप्नील बाकाळकर यांसह शिवबा प्रतिष्ठानच्या सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.