(पाचल / तुषार पाचलकर)
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्त राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावतीने स्वछता पंधरवडा, स्वछता ही सेवा हे अभियान यशवी करण्याचे आव्हान करण्यात आले होते. या अनुषंगाने रविवारी महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताने शनिवारी व रविवारी ०१ ऑक्टोबर रोजी राजापूर पोलीस स्टेशन येथे पोलीस स्टेशन व परिसरात पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबविण्यात आली व स्वच्छता लोकचळवळीचे रूप देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांचेसमवेत इतर पोलीस अधिकारी व कर्मचारी या स्वछता मोहिमेत सहभागी झाले होते.