(पाचल / तुषार पाचलकर)
राजापूर पोलीस ठाणे हद्दीत आज सायंकाळी राजापूर मापारी मोहल्ला येथे अर्जुना नदी पात्रात आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत पाण्यात बुडणाऱ्या लोकांना वाचविण्याची मॉक ड्रिल घेण्यात आली. सदरची मॉक ड्रिल राजापूर पोलीस ठाणे पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच नगर परिषद राजापूर यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आली होती.
पावसाळा ऋतूत थोडासा जरी पाऊस पडला तरी राजापूर तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत अर्जुना नदीच्या पात्रात भरपूर प्रमाणात पाणी साचले जाते संपूर्ण बाजारपेठ जलमय होते. यामुळे काहीजण या पाण्यात अडकतात व बुडण्याचा संभव असतो त्यांच्या सुरक्षितेसाठी पोलीस यंत्रणा कायम जागृत असते. पावसाळा काही दिवसावर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर आज राजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मॉक ड्रिल घेण्यात आली.
सदरवेळी पोलिस ठाणे हद्दीतील शोध व बचाव पथक सदस्य यासहित पोलीस उप निरीक्षक श्री उबाळे, श्रीम. शिल्पा वेंगुर्लेकर, पोलीस नाईक सचिन वीर व पोलिस अंमलदार उपस्थित होते.