(पाचल / वार्ताहर)
संविधान दिनाचे औचित्य साधून 26 नोव्हेंबर रोजी राजापूर पोलीस स्टेशनसह, पाचल ग्रामपंचायत, श्री मनोहर हरी खापणे महविद्यालय, सरस्वती विद्यामंदिर पाचल,व तालुक्यातील प्रशासकीय कार्यालय, अनेक शाळांमध्ये संविधानाचं पूजन करून संविधान उद्देशीकेचे वाचन करण्यात आले.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आलं तसेच, याच दिवशी मुंबई येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी राजापूर पोलीस स्टेशन येथे राजापूर चे पोलीस निरीक्षक जनार्धन परबकर सह सर्व स्टाफ उपस्थित होते. तर ग्रामपंचायत पाचल येथे मा.सरपंच अशोक सक्रे, मा. सरपंच अपेक्षा मासये, माजी उपसरपंच किशोर नारकर, मा. ग्रामपंचायत सदस्य विनायक सक्रे, ग्रामविकास अधिकारी आर. आय. कांबळे, पोलीस पाटील रवींद्र खानविलकर, ग्रामस्थ श्रीकृष्ण सुतार, राजू रेडीज, दत्तराज सुतार, ग्रामपंचायत मुख्य लिपिक सुहास बेर्डे, लिपिक कल्पेश सुतार, रायपाटण पोलीस दूरक्षेत्र चे पो. कॉ. भानवसे व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.
ऑगस्ट 1947 रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती स्थापन झाली होती. अनेक बैठकांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा 26 नोव्हेंबर 1949 रोजी म्हणजेच आजच्या दिवशी स्वीकारला गेला होता. यामुळे 26 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.