(राजापूर)
रत्नागिरी जिल्ह्यात सायबर गुन्ह्यांत वाढ होत असल्याने राजापूर पोलिसांकडून ehSAS उपक्रमांतर्गत सायबर सुरक्षेविषयी जनजागृती करण्यात येत आहे. भविष्यात सायबर गुन्हे टाळण्यासाठी काय करावे, पॉक्सो कायदा, तसेच अंमली पदार्थांचे सेवन दुष्परिणाम याबाबतची जागृती राजापूर पोलीसांकडून करण्यात येत आहे. सायबर गुन्ह्याच्या चक्रात न अडकण्याची विविध उपाययोजना पोलिसांनी नागरिकांना उपलब्ध करून दिल्या असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डिजिटल व्यवहार करताना नागरिकांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. ऑनलाईन पेमेंट करताना कोणती सावधगिरी बाळगावी, कोणत्या बाबी टाळाव्यात याची माहिती राजापूर पोलिस ठाणेचे अधिकाऱ्यांनी नागरीकांना दिली. यावेळी अनेक खालचे गोवळ तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते.