(राजापूर)
तालुक्यातील पेंडखळे गावाची ग्रामदेवता श्री जाकादेवी मंदिराचे जीर्णोद्वारानंतरचे नूतन वास्तू पूजन आणि मूर्तींची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम दिनांक १० मे २०२३ ते १८ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले आहे.
बुधवारी १० मे २०२३ रोजी दुपारी ३ वाजता ग्राम देवींच्या नवीन मूर्त्या भू गावी आणण्यात येतील. तेथुन त्या ढोल-ताशांच्या गजरात, वाजत-गाजत, रथातुन मिरवणुकीने श्री कुणकेश्वर मंदिरात आणण्यात येणार आहेत. नूतन वास्तुचे वास्तुपुजन, मूर्तींची प्राणप्रतिष्ठा हे सर्व धार्मिक विधी दिनांक १३ मे २०२३ ते दिनांक १५ मे २०२३ या कालावधीत करण्यात येणार आहेत, तसेच दिनांक १८ मे २०२३ रोजी नवचंङी यागाचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवारी १५ मे रोजी दुपारी १२ ते १ या वेळेत मंदिराच्या कळसाची स्थापना परमपूज्य श्री भाबळे महाराज, ओणी, (प. पू. श्री गगनगिरी महाराज यांचे शिष्य ) यांच्या शुभ हस्ते होणार आहे. तसेच रात्री ८वाजता श्री स्वामी समर्थ प्रसादिक भजन मंडळ, बुवा श्री शामसुंदर आचरेकर यांचे सुश्राव्य भजन आणी रात्री १०वाजता साई श्रद्धा प्रतिष्ठान यांचे स्त्री पात्रानी नटलेले बहुरंगी नमन (पौराणिक गण,संगीताच्या सुरात सजलेली गौळण आणी वगनाट्य “ओढ तुझ्या पंढरीची”) असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तरी या कार्यक्रमांना सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामदेवता श्री जाकादेवी मंदिर समिती, पेंडखळे यांच्या वतीने करण्यात आले आहे.