(राजापूर)
राजापूर येथील राजापूर नगर परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने १ व २ एप्रिल रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर वर्धापन दिनाच्या औचित्याने राजापूर नगर परिषद इमारत तसेच जवाहर चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
यानिमित्त आज शनिवार १ एप्रिल रोजी स्थापना दिनाच्या अनुषंगाने सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे, ९.०० वाजता न. प. इमारतीच्या आवारात श्री सत्यनारायण महापूजा,तर दुपारी ११ वाजता महाआरती होणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता मारुती प्रसन्न आंबेवाडी भजन मंडळाचे भजन, रात्रौ ८.३० वाजता मराठी भावगीत, भक्ती, चित्रपट व लोकगीतांचा ‘अंतरंग’ हा सुश्राव्य सांस्कृतिक कार्यक्रम जवाहर चौक येथे सादर होणार आहे.
रविवार २ एप्रिल रोजी ८.३० वाजता न. प. कर्मचारी व माजी नगरसेवक यांच्या वरचीपेठ येथील राजीव गांधी क्रीडांगणावर क्रिडास्पर्धा होणार आहेत. तर सायंकाळी ६.०० वाजता न.प.च्या छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये न.प.चे अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचे आवाहन नगर परिषदेच्या प्रशासक तथा प्रांताधिकारी वैशाली माने, मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी केले आहे.