( राजापूर / तुषार पाचलकर )
तालुक्यातील प्रत्येक गटात बैठका घेऊन सहकार तालुक्यात कसा रुजवता येईल या दृष्टीने विचार विन्मय करून त्याचा प्रचार चालू असल्याची माहीती शिवसेना सहकार संघटनेचे तालुका संघटक श्री विलास नारकर यांनी पाचल येथे आयोजित केलेल्या बैठकीत दिली. पुढे बोलताना त्यांनी प्रत्येक गावागावात जाऊन सहकारचा संघटनेला कसा फायदा होईल या दृष्टीने विचार करीत असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
शिवसेना उपनेते तसेच आमदार राजन साळवी यांच्या सूचनेनुसार राजापूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये शिवसेना सहकार सेनेचे सध्या दौरे चालू आहेत. या दौऱ्या दरम्यान पाचल येथे एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत राजापूर तालुक्यातील शिवसेना सहकार संघटनेचे तालुका उपाध्यक्ष श्री. बोरगावकर, तुकाराम कानडे, सचिव कोळी, तालुका जिल्हा उपसंघटक समीर शिरवाडकर, शिवसेनेचे पाचल विभाग प्रमुख गणेश तावडे, उपजिल्हा संघटक दुर्वा तावडे, पाचल गावचे सरपंच बाबालाल फरास, उपसरपंच तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते आत्माराम सुतार, शिवसेना उपविभाग प्रमुख अफझल पाटणकर, मोहनकाका नारकर व इतर कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.