(पाचल / तुषार पाचलकर)
श्रावण अधिक मास निमित्त अधिक श्रावण कृष्ण 9 मिती सोमवार 7 ऑगस्ट ते रविवार 13 ऑगस्ट दरम्यान राजापूर तालुका अखंड वारकरी सांप्रदाय पाचल पूर्व विभागाच्या वतीने फिरत्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विविध ठिकाणी कीर्तनाचे कार्यक्रम झाले. या संपूर्ण सोहळ्याच्या समाप्ती दिवशी राजापूर तालुका वारकरी सांप्रदाय कडून पाचल एस टी. बस स्थानकात लोकांच्या सेवेसाठी एक घड्याळ भेट म्हणून देण्यात आले. यामुळे वारकरी सांप्रदायचे लोकांकडून आभार मानण्यात आले आहेत.
या सप्ताह सोहळ्यात पहिल्या दिवशी श्री राधाकृष्ण मंदिर पाचल दिवाळवाडी येथे कीर्तनकार ह.भ.प.दौलत महाराज पाटेकर (कोळंब).दुसऱ्या दिवशी, श्री दत्त मंदिर गोसावीवाडी तळवडे – कीर्तनकार ह.भ.प.पुंडलिक महाराज सुतार ( जांभवडे ) तिसऱ्या दिवशी, ह.भ.प. दत्ताराम दत्तू पाटेकर (कोळंब) यांच्या निवासस्थानी कीर्तनकार ह.भ.प. अनंत महाराज मोरे (मौदे) चौथा दिवशी श्री दत्त मंदिर येरडवं,कीर्तनकार ह.भ.प. पुंडलिक महाराज सुतार (जांभवडे), पाचव्या दिवशी ह.भ.प. सुरेश शांताराम पाटेकर ( कोळंब ) यांच्या निवासस्थानी कीर्तनकार ह.भ.प. विश्वास महाराज जामदार (भोम ). सहाव्या दिवशी श्री लक्ष्मी मंदिर करक, ह.भ.प. दौलत महाराज पाटेकर (कोळंब).व शेवटच्या सातव्या दिवशी श्री महागणपती मंदिर पेठवाडी पाचल येथे सप्ताह समाप्ती कीर्तनकार ह.भ.प दौलत महाराज पाटेकर यांचे कीर्तन झाले.
या संपूर्ण सोहळ्याला अखंड वारकरी सांप्रदाय राजापूर तालुका अध्यक्ष आण्णा पाथरे,ह.भ.प दौलत महाराज पाटेकर, संतोष चव्हाण, पुंडलिक महाराज पांचाळ, शांताराम रोगे, पप्पू साळवी, अजित बारगोडे, चंद्रकांत बेर्डे, रोहित पांचाळ इंदुलकर, राजाभाऊ सुतार,विश्वास सुतार, मनोहर गुरव,गजानन सावंत, सहदेव सुतार, गजा सुतार, राजन गुरव,चंद्रकांत गुरव, नाना दळवी, सुरेश पाटेकर, दत्ताराम पाटेकर, लांजेकर, राणे, सौ सुतार, सावंत, पाटेकर, पोलीस पाटील,वासुदेव गोसावी, विजा कलमष्टे यांची उपस्थितीसह विशेष सहकार्य लाभले.