(राजापूर)
गेली अनेक वर्षे मनोरंजन क्षेत्रात पिछाडीवर असलेल्या राजापूर शहरामध्ये येथील अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी सांगता सोहोळ्याच्या निमित्ताने चैतन्याची मेजवानी उपलब्ध झाली आहे. बँकेच्यावतीने या शताब्दी महोत्सव सांगता समारंभ ४ व ५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या वेळी करून गेलो गाव या गाजत असलेल्या नाटकाच्या माध्यमातून प्रथमच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ओंकार भोजने व हास्यसम्राट सिनेअभिनेते भालचंद्र उर्फ भाऊ कदम यांच्यासहित प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन राजापुरात प्रथमच येणार आहेत. विशेष म्हणजे करून गेलो गाव या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक राजेश देशपांडे हे तालुक्यातील येळवणचे सुपुत्र आहेत, तर निर्माते जैतापूरचे असलेले ख्यातनाम अभिनेते महेश मांजरेकर हे आहेत.
राजापूर अर्बन बँकेचा सांगता समारंभ शहरातील पाटीलमळा येथील यशोधन सृष्टी येथे चार व पाच नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने राजापूर अर्बनने दोन दिवस राजापूरवासियांसाठी निखळ आनंदाची मेजवानी दिली आहे. यामध्ये शनिवार दि. ४ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेदहा वाजता मान्यवरांच्या हस्ते या सांगता समारंभाचा शुभारंभ, मान्यवरांचा सत्कार, स्मरणिका प्रकाशन, अध्यक्ष व मान्यवरांची मनोगते, स्नेहभोजन, दुपारी राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, बैंकिंग सल्लागार गणेश निमकर यांच्यासहित सहकार संवाद, सायंकाळी प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन यांचा गायनाचा कक्रम होणार आहे.
रविवार दि. ५ नोव्हेंबर रोजी महिलांसाठी विशेष र्काक्रम, श्रीदेव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ यांच्या पारंपारिक व आधुनिक फुगड्या, त्यानंतर संजय उपाध्ये यांचा बहारदार गप्पांचा कार्यक्रम व रात्री करून गेलो गाव हे नाटक सादरीकरण होणार आहे. राजापुरातील नागरिकांसाठी ओंकार भोजने, भाऊ कदम यांचा अभिनय पाहाण्याची व प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन यांचे गायन अनुभवण्याची संधी उपलब्ध झाली आहे.
रविवार दिनांक ५ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी १०. ३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत खास महिलांसाठी फुलांची आरास स्पर्धा , ज्वेलरी मेकिंग प्रशिक्षण , होम मिनिस्टर , बॅंक कर्मचारी गुण दर्शन कार्यक्रम, दुपारी स्नेहभोजन व सायंकाळी ३ ते ५ या वेळात श्री देव भैरव जोगेश्वरी फुगडी मंडळ कुडाळ यांच्या झिम्मा फुगडी चा कार्यक्रम होणार आहे. या वेळी पालकमंत्री ना. उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार शेखर निकम, राज्य सहकार आयुक्त अनिल कवडे, राज्य अप्पर निबंधक शैलेश कोतमिरे, बैंकिंग सल्लागार गणेश निमकर, माजी अध्यक्ष रविंद्र ठाकूरदेसाई आदी प्रमुख | मान्यवर म्हणून उपस्थित राहाणार असल्याची असल्याची माहिती बँकेचे चेअरमन हनिफ काझी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी शेखरकुमार अहिरे यांनी दिली. या कार्यक्रमांच्या नियोजनासाठी सध्या बँकेचे संचालकमंडळ तसेच अधिकारी व कर्मचारी व्यस्त आहेत.