( साईशा / जैतापूर )
राजापूर तालुक्यातील हसोळ येथील गौरी नारायण चौकेकर एमपीएससी परीक्षेत सहाय्यक कक्ष अधिकारी तसेच विक्रीकर निरीक्षक अशा दोन पदांसाठी पात्र ठरली आहे. गौरीचे प्राथमिक शिक्षण हसोळ तर महाविद्यालयीन शिक्षण कणकवली येथे झाले.
महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तीने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. एमपीएससी परीक्षेला विलंब होत असल्याने तिने दरम्यान झालेल्या विविध स्पर्धा परीक्षा दिल्या. म्हाडासाठी दिलेल्या परीक्षत तीने यश संपादन केल्याने काही दिवसापूर्वी तिला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लिपिक पदासाठी नियुक्ती पत्र देण्यात आले हेते.
त्यानंतर चारच दिवसात एमपीएससी 2020 च्या निकालात ती सहायक कक्ष अधिकारी पदासाठी पात्र ठरले. त्यानंतर जाहिर झालेल्या एमपीएससी 2021 परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यात तिची विक्रीकर निरीक्षक पदावर निवड झाली आहे. याबद्दल तिचे कौतुक होत असून लवकरच तीचे कलेक्टर होण्याचे स्वप्नही पूर्ण होण्याच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत.