राजापूरातील ग्रामीण रुग्णालय येथे दिनांक 10/05/2021 रोजी दुपारनंतर वय वर्ष 45 वरील नागरिकांना लस उपलब्ध करण्यात आली आणि प्रचंड मोठी गर्दी झाल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे अनेक नागरिकांना लस उपलब्ध असून देखील ऑनलाईन नोंदणीची वेळ संपल्याने लस न घेताच घरी परतावे लागले.
या सगळ्या परिस्थितीचा विचार करून ग्रामीण रुग्णालय राजापूर ने आज दुपार नंतर केवळ 100 डोस वय वर्ष 45 वरील नागरिकांना उपलब्ध केले. तरी देखील 11 वाजल्या पासून नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात नंबर लावण्यासाठी रांग लावली. त्यामुळे आज देखील गर्दी होऊन गोंधळ होण्याची शक्यता असल्याने मित्रमेळा राजापूर च्या वतीने ग्रामीण रुग्णालयात संपर्क करून नियोजन बद्ध पद्धतीने लसीकरण करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयातील मेस्त्री मॅडम, निकेत कुडाळी व श्री कोकणे यांच्याशी संपर्क केला. व ग्रामीण रुग्णालय व मित्रमेळा राजापूर या दोघांच्या समन्वयाने आजचे लसीकरण सुसूत्र पद्धतीने व गडबड गोंधळ विरहित पार पाडले. त्याबद्दल सर्व नागरिक व ज्येष्ठ नागरिक यांनी सर्वांचे आभार मानले.
अशा प्रकारे नियोजन बद्ध पद्धतीने लसीकरण चालू राहिल्यास सर्वांना व्यवस्थित व वेळेत लस मिळेलच त्याच बरोबर ज्येष्ठ नागरिकांची होणारी ससे होलपट ही थांबेल. त्याच बरोबर सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल.
ग्रामीण रुग्णालयातील सौ. मेस्त्री मॅडम यांच्या मार्गदर्शनखाली व नीकेत कुडाळी यांच्या सहकार्याने मित्रमेळा राजापूर च्या वतीने आज राजापूर ग्रामीण रुग्णालय येथे ॲड सुशांत पवार, मंदार पेणकर ,सुरज पेडणेकर, अनंत रानडे, निलेश खानविलकर व अध्यक्ष विवेक गुण्ये यांनी चोख व्यवस्था पार पाडली व आजची लसीकरण मोहीम यशस्वी केली.