(राजापूर)
राजापूर तालुक्यातील मूर येथील संजय राजाराम नांदलस्कर यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले. सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी नांदलस्कर यांचे सुमारे 11 लाख रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मूर शेट्येवाडीनजीक राहणारे संजय नांदलस्कर हे शुक्रवारी सकाळी काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना सकाळी 10 च्या सुमारास त्यांच्या घरातून धूर येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी नांदलस्कर यांच्या घराकडे धाव घेतली. तोपर्यंत संपूर्ण घराला आगीने वेढले होते. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याची टंचाई असल्याने आग आटोक्यात आणण्यात त्यांना यश आले नाही. काही वेळातच संपूर्ण घर जळून खाक झाले.
शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत असून या आगीत नांदलस्कर यांचे टिव्ही, फिजसह अन्य इलेक्ट्रीक वस्तू तसेच कपड्यांचे कपाट, किंमती वस्तू जळून खाक झाल्या आहेत. दरम्यान नांदलस्कर यांच्या घरात 4 सिलिंडर होते. आग लागलेली असताना ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत सर्वप्रथम सर्व सिलिंडर घराबाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. जर सिलिंडरचा स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या घरांनाही धोका पोहोचण्याची शक्यता होती. मात्र ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन आटोक्यात आणली