(राजापूर)
राजापूर तालुक्यातील मौजे सोल्ये रेल्वेस्थानकाजवळ हॉटेल सिद्धेशच्या मागील बाजूला एका खोलीत ठेवलेला दारूसाठा जप्त करण्यात आला. ही कारवाई ३० जुलै रोजी करण्यात आली. या कारवाईत १७,३६१ रुपये किमतीची गोवा व महाराष्ट्र बनावटीची दारू जप्त करत एकावर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी बेकायदेशीररीत्या दारू बाळगल्याप्रकरणी नितीन राजाराम शिंदे (५२, रा. आंगले, शिंदेवाडी, ता. राजापूर) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे.