(राजापूर)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसादिवशीच बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने उध्दव ठाकरे शिवसेनेला दणका दिला आहे. शिवसेनेचे अणसुरे उपविभाग प्रमुख राजन कोंडेकर यांच्यासह जैतापूर, मोरोशी व निखरे भागातील शेकडो शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे.बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुका अध्यक्ष अशफाक हाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत या सगळयांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी हाजू यांनी या सर्व प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले.
राजापुरात उध्दव ठाकरे शिवसेनेला दणके बसत आहेत. अनेक जण पक्ष सोडत आहेत. यापुर्वी अनेकांनी शिवसेनेचा त्याग करत बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला. गुरूवारी राजापुरात अशफाक हाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत अनेकांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला.
यामध्ये शिवसेनेचे अणसुरे उपविभाग प्रमुख राजन कोंडेकर यांसह मोरोशी, निखरे भागातील शेकडो शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोबत राजन कोंडेकर, अनंत कदम, अशोक कानडे, महादेव पडयार, गोवींद सौंदळकर, बाबू कोरगावकर, प्रवीण नकाशे, चेतन तांबे, सुधीर पोटले आदींसह अनेकांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
याप्रसंगी भरत लाड, नाना कोरगावकर, प्रशांत गावकर, बाळकृष्ण तानवडे, हातिवले ग्रामपंचायत सदस्या दिपाली शिंदे, सारिका धालवलकर, मिठगवावणे ग्रामपंचायत सदस्या जान्हवी गावकर, जितू गावकर आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.