( राजापूर / प्रतिनिधी )
तालुक्यातील समर्थनगर, भटआळी येथील एका 22 वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दिपाली अशोक इंगळे (22, समर्थनगर, भटआळी, राजापूर, मूळ कोल्हापूर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. ही घटना 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिपाली ही पहिल्या वर्षाचे ऑनलाईन शिक्षण घेत होती. 13 नोव्हेंबर रोजी तिचे आई – बाबा दुचाकीवरुन राजापूरातील नातेवाईकांकडे गेले होते. दिपाली ही घरी एकटीच होती. सायंकाळी आई बाबा घरी आल्यावर घराचा दरवाजा बंद दिसला. त्यांनी दिपालीला हाका मारल्या परंतु प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी घराचे माडीवर जावून पाहिले. यावेळी दिपाली ही गळफास घेतलेल्या स्थितीत दिसून आली. तिला राजापूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी तपासून तिला मयत घोषित केले. तिच्या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे