(चिपळूण)
वालोपे-भोजेवाडीत भाड्याने राहणाऱ्या राजस्थानमधील ५५ वर्षीय प्रौढाचा बुधवारी मृत्यू झाला. याची पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. शुभूसिंह भाटी असे त्याचे नाव आहे. तो १५ फेब्रुवारी रोजी वालोपेत राहत असलेल्या भाड्याच्या खोलीत बेशुध्दावस्थेत पडला होता. याची माहिती मंगीलालने घरमालकाला दिली. त्यानंतर भाटींना कामथे रूग्णालयात दाखल केले. मात्र तो मृत झाल्याचे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.