(रत्नागिरी)
शिवसेना पक्षप्रमुख श्री.उद्धव ठाकरे तसेच शिवसेनेतील सर्व नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांना विरोधकांकडून होणाऱ्या कटकारस्थानाविरोधात लढण्याचे बळ मिळावे यासाठी समाजसेविका वृंदा बोरकर यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी तालुक्यामधील वरवडे गावातील नवदुर्गा महिला समूह यांनी आपल्या कुटुंबासहित कार्ल्यातील एकविरा आई व जेजुरी मधील खंडोबा देवाच्या चरणी जाऊन साकडे घातले. श्री.उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेला कायम यश लाभो अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.