(मुंबई)
अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ व कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर नेमणुका करण्यात आल्या आहेत. डॉ. रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे, डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरु पदी डॉ संजय भावे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे राज्यपाल आणि कुलपती रमेश बैस यांनी कुलगुरुंच्या निवडीची घोषणा केली आहे. मागील काही काळापासून या विद्यापीठांच्या कुलगुरुंची पदे रिक्त होती.
राज्यपाल तथाविद्यापीठांचेकुलपती रमेश बैस यांनी आज कुलगुरु निवड जाहीर केली. डॉ रवींद्र दत्तात्रय कुलकर्णी यांची मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर डॉ सुरेश वामनगीर गोसावी यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपालांनी डॉ. संजय घनश्याम भावे यांची डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती केली आहे.
मुंबई विद्यापीचे कुलगुरू म्हणून निवडण्यात आलेले डॉ. रवींद्र कुलकर्णी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे वरिष्ठ प्राध्यापक आहेत तर डॉ. सुरेश गोसावी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागात वरिष्ठ प्राध्यापक आहेत. डॉ. संजय भावे हे डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत.
रवींद्र कुलकर्णी हे मुंबईतील माटुंगा येथील रसायन तंत्रज्ञान संस्थेतील (आयसीटी) प्राध्यापक व विभागप्रमुख कार्यरत होते. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या काळात डॉ रवींद्र कुलकर्णी यांनी मुंबई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू म्हणून कारभार सांभाळलेला आहे.
डॉ. सुरेश गोसावी हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. डॉ. गोसावी यांनी एमएस्सी. पीएच. डी. पदवी मिळवली असून त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर सादर केले आहेत. तर प्लाझ्मा पॉलिमरायझेशन वापरून लिथोग्राफी आणि नमुना हस्तांतरण, ड्राय इलेक्ट्रॉन बीम संश्लेषण, मल्टी-इलेक्ट्रॉन बीम लिथोग्राफी सिस्टम डिझाइन, नॅनोमटेरियल्स, नॅनोटेक्नॉलॉजी मायक्रो फ्लुइड क्स, सॉफ्ट लिथोग्राफी हे त्यांच्या संशोधनाचे विषय होते. तर डॉ संजय भावे हे डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे ऍग्रिकल्चरल बॉटनी विभागाचे विभागप्रमुख आहेत. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीचे विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे हे अतिरिक्त कारभार संभाळत होते.
मुंबई, पुणे आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते. निवड समितीकडून अंतिम ५ जणांच्या नावाची यादी कुलपती तथा राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे पाठविण्यात येईल. त्यानंतर निवड राज्यपालांकडून मुंबई, पुणे आणि कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंची निवड करण्यात आली आहे.